राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात. आक्रमक स्वभाव असलेल्या अजित पवारांचे आज एक वेगळे आणि खूपच खास रूप पहायला मिळाले. बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांच्याकडे एका झेरॉक्स दुकानाच्या चालकाने एक इच्छा व्यक्त केली आणि अजित पवारांनी तात्काळ त्याची ती इच्छाही पूर्ण केली.
झालं असं की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती दौरा होता. या दौऱ्यात विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली. त्यानंतर दौऱ्यावर असताना त्यांनी बारामतीत नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी ध्वज वंदन केले. एका कार्यकर्त्याने झेरॉक्सच्या दुकान सुरू केले. सुहास मढवी असे दुकानदाराचे नाव आहे. त्या दुकानाचे उद्घाटन अजित दादांनी करावे, असा मानस त्याचा होता. त्याने दादांना विनंती केल्यानंतर दादांनी कुठलेही आढेवेढे न घेता या कार्यकर्त्यांच्या छोट्याशा दुकानाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले. यावेळी दादांनी झेरॉक्स कशी काढतात हे देखील शिकून घेतले. तसेच त्याला त्याच्या दुकानासाठी शुभेच्छा देखील दिल्या. कार्यकर्त्यांची आपुलकीने चौकशी देखील केली. अजित पवार यांनी बारामती येथील प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण केलं त्यानंतर प्रशासनात चांगली कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. अजित पवार म्हणाले, मी जर बटन दाबून दुकानदाराचे समाधान होत असेल तर कशाला त्याला नाराज करायचे? म्हणून झेरॉक्स दुकानाला भेट दिली.























