Monday, September 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे काय ? संशोधन अहवाल समोर आला आहे….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 1, 2023
in maharashtra
0
समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे काय ? संशोधन अहवाल समोर आला आहे….
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची संख्या देखील वाढली आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या दरम्यान प्रवासासाठी लागणार वेळ कमी झाला आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तीन महिने संशोधन केले. या संशोधन अभ्यासात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

संमोहनामुळे अपघात!
समृद्धीवरील अपघातासाठी ‘महामार्ग संमोहन’ जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुम्ही कधी ‘महामार्ग संमोहन’ हा प्रकार कधी ऐकला का? जेव्हा एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो.. कोणत्याच अडथळ्यांशिवाय, त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक मिनिटे धावत असते…अशा परिस्थिती मध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदूदेखील क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला ‘महामार्ग संमोहन’ असे म्हणतात. हा प्रकार समृद्धी महामार्गावर चालकांसोबत घडत आहे. समृद्धी महामार्गावर गाडी चालवतांना अनेक चालक हे ‘महामार्ग संमोहनाचे’ बळी ठरले असून अपघाताच्या काही सेंकंद आदी त्याच्या मेंदूने व शरीराने जी हालचाल किंवा क्रिया करायला हवी ती वेळेत न केल्याने अपघात झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनात ही माहिती पुढे आली आहे. ‘महामार्ग संमोहन’ हे 33 टक्के अपघाताला कारणीभूत ठरल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले.

नियमांचे पालन न करणे

‘लेन कटिंग’ हे समृद्धी महामार्गावर अपघाचे आणखी एक प्रमुख कारण आहे. समृद्धी महामार्गावर तीन पदरीचे दोन स्वतंत्र  ट्रॅक आहे. त्यामुळे  समोरासमोर वाहन धडकून अपघात घडण्याचा प्रश्न  नाही. मात्र आजवर झालेले बहुतांश अपघात हे साईड डॅशमुळे झाले आहे. समोरच्या वाहनाचा चालक आपली लेन सोडून दुसऱ्या लेनवर जातांना नियमाचे पालन करत नाही. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या सुसाट वाहनासाठी समोरच्या वाहनांची ही अनपेक्षित मुव्हमेंट असते.  त्यातच महामार्ग संमोहनची क्रिया काम करत असल्याचे चालकाला सतर्क व्हायला एका सेकंदाची ही संधी मिळत नाही. त्यामुळे साईड डॅश होतो आणि त्यानंतर भीषण अपघात होत असल्याचे या संशोधनात पुढे आले आहे. आजवर झालेल्या अपघातात 40 टक्के या साईड डॅशमुळे झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अति वेगामुळे अपघात

समृद्धी महामार्गावर 30 टक्के छोटी वाहने व 20 छोटी मालवाहू वाहने वेगमर्यादा ओलांडत असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. त्यातच 51 टक्के ट्रकचालक हे लेन फालो करत नसल्याचे पुढे आले. त्यातच  समृद्धी महामार्गावर वळण मोजके असली तरी त्यांचा घेरा मोठा आहे. त्यामुळे चालक सरळ रोड समजून वाहन सरळ रेषेत पुढे नेतो. त्यामुळे चालकांकडून लेन फॉलो न झाल्याने देखील अपघात झाल्याचे संशोधनात पुढे आले आहे. याला असिव्ह ड्राईव्ह असे म्हणतात. हे 11 टक्के अपघाताला कारणीभूत ठरले आहे. कमजोर किंवा कालबाह्य टायर वापरले जात असल्याने सिमेंट रोडवर टायर फुटणे हे देखील 34 टक्के अपघाताला कारणीभूत ठरले आहे. सोबत काही कारणाने चालकाचे लक्ष विचलित झाल्याने 24 टक्के अपघात झाले तर मोबाईलचा वापर 8 टक्के अपघाताला कारणीभूत ठरला आहे. या सर्वांमध्ये अतिवेग हा समान धागा असल्याचे या संशोधनात दिसून आले.

अपघात कसे कमी होतील?

प्रफुल मडधे, प्रतीक गजलेवार, विनय राजपूत, आयुष्य दूध बावरे या ‘एमटेक’च्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावरचे  अपघात कमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना सुचवल्या आहे. महामार्ग संमोहनापासून वाचण्यासाठी चालकाला मेंदू सक्रिय अवस्थेत ठेवण्यासाठी काही ठराविक अंतरावर वेगवेगळे साईनबोर्ड लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामुळे ते साईनबोर्ड बघताना चालकाचा मेंदू सक्रिय राहील. सोबतच लेननुसार, स्पीड साईन बोर्ड, फीड बॅक साईन बोर्ड, स्पीड कॅमेरा, सीसीटीव्ही ज्यामुळे सतत चालक वाहन चालवतांना स्वत:ला सक्रिय ठेवेल आणि नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेईल, अशी सूचना या विद्यार्थ्यांनी केली आहे.

Post Views: 116
Previous Post

कार्यकर्त्याची मर्जी राखण्यासाठी अजित पवार थेट झेरॉक्स दुकानात…..

Next Post

नितीन गडकरी युवा मजदूर फाउंडेशन, नागपूर आयोजित मजदूर महोत्सवाला संबोधित करताना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नितीन गडकरी युवा मजदूर फाउंडेशन, नागपूर आयोजित मजदूर महोत्सवाला संबोधित करताना

नितीन गडकरी युवा मजदूर फाउंडेशन, नागपूर आयोजित मजदूर महोत्सवाला संबोधित करताना

ताज्या बातम्या

कुंभारीत कुऱ्हाडीने निर्घृण खुन #viral #solapurnews #news#crimenews

September 28, 2026

पुनम गेटमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांचे सशक्त आंदोलन #viral #solapurnews #aajsolapur #latestnews

September 28, 2026

मुख्यमंत्रीही म्हणाले काळजी घ्यावी लागेल #viral #news #marathinews#maharshtranews #cmo

September 28, 2026

हे सांगतात तज्ञ अलनिनोबाबत #viral #news #newsupdate #latestnews

September 28, 2026

सावकारी पाश सरकार आवळणार #viral #news #marathinews #latestnews

September 28, 2026

पारंपारिक पद्धतीत निघाली ताता गणपतीची मिरवणूक…

September 27, 2026

आप्पा गणपतीची निघाली दिमाखात मिरवणूक…

September 27, 2026

आचारसंहितेचा फटका भावी गुरुजींना? पवित्र पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण

September 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1271701

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!