मोहोळ – चिंचोली काटी येथील जागा वाटपात मोठा घोटाळा झाला असून ज्यांची पक्की घर आहेत अशा एका घरातील अनेकांची नावे स्थानिक पुढाऱ्यांनी स्वार्थापोटी घातली आहेत याची सखोल चौकशी करून ग्रामस्थांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी भाजपचे तालुका चिटणीस दिलीप आलदर यांनी दिला आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे
चिंचोली काटी ग्राम पंचायतच्या वतीने ४८ घरकुल लाभाथ्यांना गायरान क्षेत्रातील जागा वाटप करण्यात आली असून या जागा वाटपात मोठा घोटाळा करण्यात आला आहे जे लाभार्थी आहेत त्यांची गावरान क्षेत्रामध्ये इतर ठिकाणी भरपूर जागा अन मजबूत घरे आहेत एकाच कुटूंबातील अनेक व्यक्तींची नावे आहेत केवळ राजकारणासाठी वस्तुस्थिती न पहाता कामकाज करण्यात आले आहे तसेच गायरान क्षेत्रात आठशे ते नऊशे पक्की घर मजबुत घर पक्क बांधकामे आहेत त्यांनी ५० ते ६० एकर जागा व्यापली आहे शिवाय त्यांना सर्व सोई ग्राम पंचायतने उपलब्ध करून दिल्या आहेत एका एका व्यक्तीने गावरान मध्ये १० कुठे पेक्षा जास्त कब्जा करून ठेवला आहे शासनाने सर्वासाठी घर हे धोरण लक्षात घेता पाच ते सहा एकर जागेत सर्वच कुटूंबे बसू शकतात त्यामुळे योग्य विचार करावा अशी सुचनाही करण्यात आली आहे
या गावची ९५ टक्के जमीन औदयोगीक वसाहतीने व्यापली आहे अनेक भूमीहीन आहेत सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत त्यांना व्यवसाया साठी प्लॉट मिळत नाही बचत गटाच्या महिलांना स्टॉल जागा नाही अशासाठी घरकूल योजनेसाठी मंजूर केलेली जागा वापरणे योग्य ठरेल याबाबत विचार व्हावा
याबाबत जिल्हाधिकारी यांना १० जुलै रोजी पत्र देण्यात आले होते परंतु कारवाई झालेली नाही म्हणून तहासिलदार मोहोळ यांना भाजपचे तालुका चिटणीस दिलीप आलदर यांनी निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे अन्यथा १९ आगस्ट पासून अमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे