याबबतचे वृत्त असे की, भिमा नदीचे काठी वसलेल्या मिरे गावातील सुरज गायकवाड यांनी आपल्या शेता मध्ये पोल वर सि सी व्ही चा कॅमेरा बसवला असून त्यांना रात्री आपल्या शेतात बिबट्या सदृश प्राणीअसल्याचे निदर्शनास आले . यावर त्यानी बिबट्याचा वावर असलेले फुटेज सोशल मिडीयावर व्हायलर करत सर्वनागरिकांन सावध केले तसेच माळशिरस वनविभागाला कळवून योग्य ती कारवाई करणेचे निवेदन दिले .
यावर वनविभाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येवून त्यांचे रानात व परिसराची पाहणी केली परंतु कोरडे व मुरमाड रानामुळे बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे आढळून आले नाहीत . परंतू सी सी टीव्ही फुटेज मध्ये दिसलेला बिबट्या सदृश प्राण्या पासून सावध राहणेचा सल्ला देवून पुन्हा तो दिसल्यास अथवा दारातील पाळीव प्राण्यावर हल्ला झाल्यास त्वरीत आम्हांला कळवावे म्हणजे उपाय योजना करता येईल असे सांगितले .
मागच्या चार पांच दिवसा पूर्वी वाघोली या ठीकाणीही प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याचा व्हीडीओ व्हायलर झाला होता . त्यामुळे याभागात बिबट्या सदृश प्राणी असल्याचे जाणवते त्यामुळे नागरिकां मध्ये भितीचे वातावरण आहे .




















