सोलापूर – सहकार क्षेत्रात अत्यंत नावाजलेली पतपेढी म्हणजे श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतपेढी होय. त्याची व्यवसाय आता 600 कोटी पर्यंत नेणार असल्याचे संकल्प संचालक मंडळांनी केले असल्याचे मत चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी यांनी व्यक्त केले.
कन्ना चौक येथील तोगटवीर भवन मध्ये संपन्न झालेल्या 39 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वरील संकल्प करण्यात आला. सभेच्या सुरुवातीला चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगीरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी व्हाईस चेअरमन विलास बडगंची यांच्यासह समाजाचे अध्यक्ष व सल्लागार नागनाथ कोंतम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी म्हणाले की पतपेढीची मिश्र व्यवसाय आता 575 कोटी झाले असून लवकरच 600 कोटींचा व्यवसाय आम्ही पूर्ण करण्याचा विश्वासाचा संकल्प सर्व सक्षम संचालक मंडळाने व सेवकांनी घेतला आहे यामध्ये प्रामुख्याने ठेवीदार, गुंतवणूकदार आणि तसेच कर्जदार यांचा समावेश आहे. आणि या आर्थिक वर्षात 10 महिन्यात 100 कोटी मिश्र व्यवसाय पूर्ण झालेला असून तसेच एकही सोने जिन्नस कलम लिलाव झालेला नाही.
आपल्या पतपेढीचा व्यवसाय पाहता संरक्षित कर्जच जास्त प्रमाणात दिली गेली आहेत त्यामुळे शंभर टक्के रिकवरी होण्याकडे पतसंस्थेचा कल असतो. सभासद गुंतवणूक आणि कर्ज घेणारे ग्राहक, हे यामुळेच संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढचे आर्थिक वर्ष हे 40वे वर्षे असून यावर्षी संस्थापक संचालकांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात यावे असे यावेळी ठरले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
या 39व्या सर्वसाधारण सभेस आलेल्या सर्वसामान्य सभासदांचे प्रश्न देखील ऐकून घेण्यात आले आणि त्यांच्या शंकांचे निरसन देखील करण्यात आले. या वार्षिक सर्वसाधारण सभेस जेष्ठ संचालक अरुण चिंता, विठ्ठल बडगंची, अरविंद पुडूर, नरेंद्र बत्तुल, मोहन खंडे, विष्णू म्याकल, शंकर कोंतम,अजय रंगम, चंद्रकांत रंगम, सौ. उमा पुरुड, अंबिका उदगिरी, विजयकुमार शिंपी, रूपसिंग राठोड, भगवंत फलमारे, अंबादास कंदीकोंडा, व्यवस्थापक श्रीकृष्ण डक्का व उपव्यवस्थापक अनिल चिंता आदींसह सभासद व सेवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Post Views: 23