बार्शी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद मुलींची शाळा पानगाव येथील विद्यार्थिनी योगिता दयानंद चव्हाण ही शिष्यवृत्ती धारक झाली असून गुणवत्ता यादीत तीने स्थान मिळवले आहे. तिच्या यशामुळे जिल्हा परिषद मुलींची शाळेचा लौकिक वाढला असल्याच्या भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत. अभ्यासातील सातत्य,चिकाटी आदीमुळे योगीताने यश मिळवले आहे.तिला,मुख्याध्यपक जीवराज कोंढारे ,वर्गशिक्षिका मधुरा पाटील,सुलभा काळे,सीमा देशमुख, यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल तिचे बार्शीचे गटशिक्षण अधिकारी गजानन बाजड,विस्तार अधिकारी धनाजी जाधवर,जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार काळे केंद्रप्रमुख शकुंतला पालके,सरपंच अंकुश मोरे,शिवाजी चव्हाण, प्रकाश नलवडे यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
Post Views: 16