सोलापूर : पोलीस दलात गेल्या १८ वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावणारे विजापूर नाका पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार रमेश कोर्सेगाव यांचा भारत सरकारच्या उत्कृष्ट सेवा पदकाने गौरव करण्यात आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अंमलदार रमेश कोर्सेगाव यांनी आतापर्यंतच्या सेवाकाळात त्यांनी विविध स्तरांवर सुमारे २५० पुरस्कार व प्रशस्तीपत्रे मिळविली असून, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा सन्मान मिळाला आहे.
विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेमणूक झाल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासह विविध पोलीस कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. कोणतेही कर्तव्य असो, ते जबाबदारीने पार पाडण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे वरिष्ठ अधिकारी तसेच सहकाऱ्यांकडून त्यांचे सातत्याने कौतुक झाले.
१८ वर्षांच्या सेवेत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत २५० हून अधिक पुरस्कार व प्रशस्तीपत्रे प्राप्त झाली आहेत. या कामगिरीला आता भारत सरकारच्या उत्कृष्ट सेवा पदकाची जोड मिळाल्याने पोलीस दलात त्यांचे अभिनंदन होत आहे. कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि प्रामाणिक सेवेला मिळालेली ही पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Post Views: 16