सोलापूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर , स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते ,सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या ६३ अर्जांमधून निवड समितीने कामगिरीची छाननी करून ३४ जणांची अंतिम निवड केली. या पुरस्कारामुळे नियमित प्रशासकीय कामासोबत नागरिकांना सेवा देताना उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रक्रियेत विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, आरोग्य विभागातील कर्मचारी, संगणक विभागातील कर्मचारी तसेच सामाजिक विकास विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सोलापूर महापालिकेतील गुणवंत अधिकारी -कर्मचारी पुरस्कार सत्कारमूर्ती याप्रमाणे – झोन अधिकारी विजय लोखंडे, विधान सल्लागार संध्या भाकरे, वैद्यकीय अधिकारी प्रसन्नजीत वाघचवरे, जनगणना कार्यालयातील अनुरेखक जयंत भोसले, नगर अभियंता कार्यालयातील कनिष्ठ अभियंता मनोज जाधव, आरोग्य निरीक्षक विलास कदम, सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ मुख्य लेखनिक विजय तिऱ्हेकर ,भूमी व मालमत्ता विभागातील वरिष्ठ मुख्य लेखनिक प्रशांत जाधव, कामगार कल्याण व जनसंपर्क कार्यालयातील कनिष्ठ लिपिक शिवराम मोटे ,अंतर्गत लेखापरीक्षक कार्यालय कनिष्ठ लिपिक महादेव ढेकणे, नगरसचिव कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सुमित आकाडे, अतिरिक्त आयुक्त कार्यालय कनिष्ठ लिपिक पांडुरंग घाडगे, विधान सल्लागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रमेश मोहिते, मुख्य लेखा परीक्षक कार्यालय कनिष्ठ लिपिक सोहम माने, मालमत्ता कर विभागातील कनिष्ठ लिपिक विवेक पेरला, सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपिक जगन्नाथ केल्लूरकर, विभागीय कार्यालय क्रमांक पाच कडील जमादार महंमद हुसेन पटेल, नगर अभियंता विभागीय कार्यालय क्रमांक एक कडील जमादार कालिदास कोरे , पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रस्तुतीगृह मिडवाइफ सुनिता ढगे, आरोग्य खात्यातील मिडवाइफ रेशमा शेख, भूमी व मालमत्ता विभाग उपअधीक्षक सिद्राम तूपदोळकर, एन यु एच एम कडील गुणवत्ता हमी सहाय्यक वेंकटेश आरगे, संगणक विभागाकडील सिस्टीम ॲनालिस्ट वसीम सय्यद, त्याचबरोबर गुणवंत शिपाई, बिगारी व सफाई कामगार अशा स्वयंसेविका यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला यामध्ये नागनाथ जाधव, किरण शंके, आकाश पेंद्दी, प्रशांत कोंडीघंटी, अंबिका देढे , जया कावल, कुर्मका मंदोलु, खाजाबी शेख, रविकांत कांबळे, समाज विकास विभागाकडील समुदाय संघटक नागेश क्षीरसागर, जमादार हिरालाल एडके, महापालिकेतील दिव्यांग कर्मचारी गायत्री पेंदंटी, शिवशरण गडदुरे , माऊली अडकुर, प्रभाकर कदम यांना विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. दरम्यान, याप्रसंगी सुद्री वादक अमोल जाधव, सोमनाथ जाधव, बलभीम जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
Post Views: 20