कासेगांव – माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया (लेन्ससहित ) तसेच सर्व रोग तपासणी शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगांव येथे घेण्यात आले. पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिचारक युवा मंच पंढरपूर यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रणव परिचारक,जिल्हा परिषदचे माजी सदस्य वसंतराव देशमुख,गोपाळपूरचे सरपंच दिलीप गुरव, भा.ज.प.चे तालुकाअध्यक्ष सुभाष मस्के, कृ.षी.उ.बा.समितीचे सदस्य,हरिभाऊ फुगारे,पंचायत समितीचे माजी सदस्य,प्रशांत देशमुख, बाळू शेख,प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व कर्मचारी तसेच कासेगांव ग्रामपंचायतीचे आजीमाजी सदस्य आणी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
Post Views: 10