सांगोला – महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बीसीए भाग-१ मधील रिक्त जागांवर कॅप अगेन्स्ट/नॉन-कॅप संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी दि.१० सप्टेंबर पर्यंत महाविद्यालयात प्रवेशपूर्व अर्ज करावा. बीसीए-सीईटी,
एमएचटी-सीईटी पीसीबी किंवा पीसीएम यापैकी कोणतीही सीईटी परीक्षा दिलेले उमेदवार बीसीए भाग-१ प्रवेशासाठी पात्र असतील. कॅप प्रक्रियेत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही संस्थास्तरीय प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. उपलब्ध रिक्त जागांच्या संख्येनुसार व शासनाच्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच संस्था स्तर अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयाशी संपर्क साधून विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी केले आहे.