सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेतील ५ विद्यार्थ्यांनी जिल्हा तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत बारावी मिनी राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. ही स्पर्धा २१ ते २३ ऑगस्ट या कालावधीत परभणी येथे होणार आहे.
जिल्हा स्पर्धेत कार्तिक नितीन मोने आणि प्रणव राजेंद्र सारंगी यांनी रौप्य तर साईकृष्णा नागनाथ आंबट, हर्ष नरसय्या एलदी आणि अथर्व सचिन चव्हाण यांनी कांस्य संपादिले. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक पवन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली, प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगु यांनी अभिनंदन केले.


















