अक्कलकोट – भाजप आमदार राम कदम यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच दर्शन घेतले. दर्शनानंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली प्रथमेश इंगळे यांनी आमदार राम कदम यांचा स्वामीचे शाल, श्रीफळ, प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना आमदार राम कदम म्हणाल की स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील सर्व जनतेला सुख, शांती आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली. स्वामींचे आशीर्वाद हे लाख मोलाचे आहेत. स्वामींच्या शिकवणीतूनच आपल्याला सेवा आणि त्यागाची प्रेरणा मिळते. अक्कलकोट हे भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे आणि येथे येऊन मनाला खऱ्या अर्थाने शांती मिळते. यावेळी मंदिराचे पुरोहित मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विपुल जाधव, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे, आदित्य गवंडी,
उपस्थित होते.
Post Views: 14