सोलापूर – नागपंचमीच्या पवित्र सणानिमित्त लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीला शिवसेनेचा झोका या संकल्पनेतून शिवसेनेकडून `शिवसेनेचा झोका हा अनोखा उपक्रम सोलापूर शहरात राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शहरातील जुळे सोलापूर, पंढरीनाथ नगर, ओम गजानन चौक, शेठे विहार विजापूर रोड, कोटणीस नगर सह एकूण 10 ठिकाणी भव्य झोके बांधून नागपंचमी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन प्रकाश राठोड ( माजी सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या उपक्रमाला शिवसेनेच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी विशेष भेट दिली. त्यांनी जुळे सोलापूर कोटणीस नगर व पंढरीनाथ नगर येथे झोक्याची विधिवत पूजा करून शेकडो लाडक्या बहिणींसोबत झोका आनंद घेतला.
यावेळी खासदार ज्योतीताई यांनी लाडक्या बहिणींसोबत अगदी मैत्रिणीसारखा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. `नागपंचमी हा सण बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक आहे. आज शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला हा आनंद देण्याचा प्रयत्न प्रकाशभाऊ राठोड यांनी केला आहे` असे त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी बोलताना खासदार ज्योतीताई म्हणाल्या, `लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मा. एकनाथजी शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा महिला सक्षमीकरणाचा विचार घराघरात पोहोचवण्याचे महत्वाचे काम प्रकाश राठोड करत आहेत. येणाऱ्या काळात जुळे सोलापूर सह हद्दवाड भागाच्या विकासासाठी मी स्वतः पाठपुरावा करून अनेक प्रकल्प उभे करेन` असे आश्वासनही त्यांनी दिले.
या 10 ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात हजारो लाडक्या बहिणींनी सहभाग घेत झोक्याचा आनंद लुटला. `नाग येतो तेव्हा नवी ऊर्जा येते, आणि बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य येते तेव्हा सण सार्थ होतो` या नागपंचमीच्या संदेशासह महिलांनी हा सण साजरा केला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रियदर्शन साठे – नगरसेवक, मिलिंद ठोंबरे, श्रीकांत बने, नवनाथ चव्हाण, अंकुश राठोड, संतोष जाधव, राहुल राठोड प्रतिभा जाधव, प्रेमदास राठोड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 15