बार्शी – साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दलित महासंघाच्यावतीने ‘राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले. रविवार दि. २३ रोजी दुपारी १ वाजता या पुरस्काराचे वितरण स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे आणि शहराध्यक्ष संदीप अलाट यांनी पत्रकान्वये कळवले आहे.
दलित महासंघाच्यावतीने मागील २००८ पासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६८ व्यक्तींना दलित मित्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अलाट यांनी यावेळी सांगितले.
यावर्षीच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी हभप. प्रा. विलास जगदाळे यांची निवड करण्यात आली तर प्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवलीला पाटील यांचा विशेष गौरव पुरस्कार आणि डॉ. संजय अंधारे यांचा सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावर्षीच्या दलित मित्र गौरव पुरस्कारासाठी उद्योजक सुभाष चव्हाण, रवींद्र राऊत, माजी नगरसेवक प्रशांत कथले, मराठा सेवा संघाचे संतोष मोळवणे, शिवशक्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब लोखंडे, पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक नितीन पाटील, युवा उद्योजक अजित डुंगरवाल, ऍड. राहुल पाटील, युवा उद्योजक तुषार बोकेफोडे, पत्रकार उमेश पवार, सत्यचित्रचे धैर्यशील पाटील, सामाजिक कार्यकर्ते धनंजय धावारे यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, तहसीलदार एफ. आर. शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Post Views: 16