बार्शी – बसस्थानक येथे बार्शी आगारातील कर्मचाऱ्यांसाठी सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) या जीवनरक्षक वैद्यकीय प्रणालीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयविकाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत सीपीआरचे ज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून बसस्थानकासारख्या ठिकाणी एकाच वेळी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे ठरले.
या कार्यशाळेत सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना डॉ. धीरज जाधव (एम.डी., इमर्जन्सी मेडिसिन) यांनी आपत्कालीन प्रसंगी सीपीआर कसा द्यावा, याचे वैज्ञानिक पद्धतीने प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिक काळजीपूर्वक पाहून स्वतः सराव केला.
या उपक्रमामुळे प्रवासादरम्यान अथवा गर्दीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास योग्य वेळी मदत करण्याबाबत जनजागृती झाली. या प्रशिक्षणाचा निश्चितच नागरिकांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा प्रतिसाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. देविदास इंगळे यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. पवन कोळी, डॉ. विनायक हगरे, डॉ. प्रीतम इंगळे, आगार प्रमुख हांडे तसेच बार्शी आगारातील कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 3