पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या महावस्त्रांचा महासेल श्री संत तुकाराम भवन येथे सुरू असून, पहिल्याच दिवशी बुधवारी (दि.१९) भाविक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान बुधवारी सुमारे ३०० भाविक व नागरिकांनी महासेलला भेट देत महावस्त्रांची खरेदी केली. या विक्रीतून मंदिर समितीस ₹३ लाख ५२ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.
महावस्त्रांना धार्मिक व भावनिक महत्त्व असल्याने ती प्रसादस्वरूपात आपल्या घरी नेण्यासाठी भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. हा महासेल दि. २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार असून, भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी केले.
Post Views: 13