बार्शी – मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये अध्यक्ष विनायकराव गरड यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर सचिव पंडितराव लोहोकरे यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करुन गावातून प्रभातफेरी काढली. यात कर्मवीर लोहोकरे गुरुजी इंग्लिश मीडियम व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीही सहभागी झाले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक, शाखाप्रमुख, जवान निखिल देशमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य सूरज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन हरिनारायण राठी यांनी केले.
Post Views: 2