अक्कलकोट – गरीबांची मुले शिकावीत मोठी व्हावीत याकरिता समाजाचे आपण काही तरी देणे लागतो ही भावना ठेऊन भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे जिल्हा परिषद शाळा टिकावी पट बाढावे म्हणून जी धडपड प्रयत्न चालू आहेत ते कौतुकस्पद असल्याचे गौरवोद्गार उद्धव बाळासाहेब ठाकारे शिवसेना जिल्हा प्रमुख शरणराज केंगनाळकर यांनी काढले .
ममनाबाद तालुका अक्कलकोट येथे भारतीय लहुजी सेना जिल्हा अध्यक्ष वसंत देडे यांच्यावतीने जिल्हा परिषद कन्नड शाळा येथे विद्यार्थ्यांना वह्या व केळी वाटपाचे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शरणराज केंगनाळकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जिल्हा प्रमुख शरणराज केंगाळकर बोलत होते .
याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख राम जाधव ,अल्पसंख्याक आघाडी जिल्हा प्रमुख एम मुलाणी , तालुका प्रमुख आय्याज जमादार ,राजु चौगुले ,फुलचंद पवार , मलकप्पा बिराजदार ,उपसरपंच रामचंद्र बिराजदार , सिद्धू पाटील ‘ कोमणणा पाटील ‘ गौराबाई बिराजदार , मुख्याध्यापक प्रभाकर भारतीय लहुजी सेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष अनिल झंपले ग्रामस्थ विद्यार्थी आदि उपस्थित होते .
Post Views: 11