श्री मंगल मारुती मित्र मंडळाच्या वतीने या वर्षी चा शालेय साहित्य वाटप करण्याचा दुसरा कार्यक्रम बापुसाहेब चिपळूण कर मराठी शाळा येथे संपन्न झाला .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिथयश उद्योजक व बांधकाम व्यावसायिक राजेश माने उपस्थित होते ,दीप प्रज्वलन करून व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली .
उमेश नारकर यांनी या उपक्रमा विषयी माहिती दिली
राजेश माने यांनी विद्यार्थ्यांना शालेय वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या नितीन नारकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करून मोठे होऊन अशाच गरजू व्यक्तींना मदत करावी असे आवाहन केले .रंगीबेरंगी नवेकोरे साहित्य पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता मुख्याध्यापक संदीप म्हस्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी अशोक काळे, आदित्य देशपांडे, मयूर नारकर, ईशान नातू, अनुज भोसले, नयन, चाळके बंधू उपस्थित होते .या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
Post Views: 6