श्रीपूर – महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिव्यांगांना पाच टक्के निधी अनुदान देण्याची तरतूद असून हे अनुदान महाळुंग नगरपंचायत चे माध्यमातून देण्यात येते . परंतू बरेच दिवसा पासून हे अनुदान मिळणे बंद झाले असल्याने ते त्वरीत मिळावे या मागणी साठी दि .१ सप्टेंबर पासून या परिसरातील सर्व दिव्यांग महाळुंग श्रीपूर नगरपंचायत समोर निषेधात्मक थाळीनाद व गोल रिंगण आंदोलन करणार आहेत पुनम सोमनाथ लाटे यांनी या आंदोलनाला अकलूज पोलिस स्टेशनमध्ये परवानगी मागणीचे लेखी पत्र दिले आहे . महाळुंग श्रीपूर नगरपंचायत तर्फे जो दिव्यागांना पाच टक्के निधी शासनाच्या नियमा प्रमाणे मिळायला पाहिजे होता त्या मध्ये खूप तफावत व भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले असून प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात मागण्या अशा आहेत सन २०१५ ते २०२१ कालावधितीत ग्रामपंचायत शिल्लक निधी , तसेच
सन २०२१ ते २०२६ नगरपंचायत शिल्लक पाच टक्के दिव्यांग निधी वाटप निधी बाबत बँक स्टेटमेंट चा अहवाल मिळावा . दिव्यांग समितीचा अहवाल व सदस्या बाबत माहिती मिळावी . भ्रष्टाचारी कर्मचारी व जो दोषी संबंधित अधिकारी त्यांचेवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या प्रमुख मागण्यां सदर्भात हे आंदोलन करण्यात येणार आहे . हे निवेदन सोमनाथ लाटे , नानासाहेब घोंगाणे, सलमान डांगे , मिलिंद कुलकर्णी , चंद्रकांत शिरहट्टी , देवराव लांडगे , नंदकिशोर लाटे, नहिदा डांगे, रमेश भोसले , सचिन सदगर , प्यापर डांगे यांनी अकलुज पोलिस स्टेशलला दिले आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















