बार्शी् – इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त निगाहे करम फाउंडेशन, ताज ग्रुप यांच्यावतीने लहान मुलांसाठी नात पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील पाच मशिदींमधील २० बालकांनी सहभाग नोंदविला.
नात पठणाच्या माध्यमातून बालकांमध्ये धार्मिक संस्कार, शिस्त, आत्मविश्वास तसेच प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीविषयीची आस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत मदनी अन्वर बागवान याने प्रथम, जैनब सादिक सापवाले याने द्वितीय तर शिपा साजन शेख याने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना सायकल, पंखा, स्टडी टेबल, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी हाफिज खालीद रजा, अल्फ रजा, इरफान पठाण, मुन्ना बागवान, वसीम पठाण आणि बबलू शेख यांनी सहकार्य केले.
Post Views: 47