बार्शी – तालुक्यातील फपाळवाडी येथे समाजकारणाच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीची बार्शी तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. एका फिर्यादीत तिघांनी तलवार, लोखंडी पाईप व लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप केला. तर दुसऱ्या फिर्यादीत एकाने चाकूने पाठीवर वार करून मारहाण केल्यासह ४ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्यांचा आरोप केला आहे.
या प्रकरणी संजय विलास आरगडे (वय ३१, रा. तावडी) यांच्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. फिर्यादीनुसार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३०, च्या सुमारास संजय आरगडे हे मोटारसायकलवरुन बार्शीकडे जात असताना फपाळवाडी येथील दत्ता दळवी यांच्या घरासमोरील रस्त्यावर समाधान दादाराव मोरे, लक्ष्मण यादव व महादेव झोडगे यांनी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार आडवी लावून त्यांना अडवले. ‘तू गावच्या समाजकारणात लय पुढे-पुढे करतोस’ असे म्हणत समाधान मोरे याने तलवारीने डोक्यात, हातावर व नडगीवर वार केल्याचा आरोप आहे.तसेच लक्ष्मण यादव याने लोखंडी पाईपने मारहाण करून धमकी दिल्याचे, तर महादेव झोडगे याने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर समाधान दादाराव मोरे (वय ३५, रा. तावडी) यांनी संजय विलास आरगडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यावरचन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे यांच्या फिर्यादीनुसार, फपाळवाडी येथील सागर चव्हाण यांच्या किराणा दुकानाजवळ तावडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संजय आरगडे यांनी ‘तू माझ्याविरोधात खोट्या केसेस करतोस’ असे म्हणत चाकूने पाठीवर वार केला. त्यानंतर मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. तसेच शर्टच्या वरच्या खिशातून ४ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करीत आहेत.
Post Views: 10