पंढरपूर – पर्यावरण संवर्धनाच्या जाणीव जागृतीसाठी विठाई बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने निरनिराळ्या ६५० रोपांचे वाटप करण्यात आले.
पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीने पुढाकार घ्यावा ही जाणीव जागृती करण्यासाठी विठाई संस्थेच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे संस्थेच्या वतीने पारिजातक, जाई, जुई, मोगरा, चाफा, जास्वंद, हिमालय पेंट्स, गुलाब या फुलझाडांची, आंबा, पेरू, सिताफळ, जांभूळ, कवठ, बेल या फळझाडांची, वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, करंजा, कदंब अशा जंगली झाडांची रोपे लोकांना आवाहन करून मोफत देण्यात आली. याप्रसंगी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जाणीव जागृती करून लोकांना वृक्षारोपणाचे महत्त्वही समजावून देण्यात आले. पोष्टर, व भित्तिपत्रकाच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या प्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सामाजिक वनीकरण विभाग, पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगलताई शहा, वृक्षप्रेमी आनंद नगरकर, विवेक बडवे या सर्वांचे या उपक्रमासाठी मोठे सहकार्य लाभले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विठाई संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, सचिव रवी ओव्हाळ, उपाध्यक्ष राम मोरे, डॉ. सचिन लादे, प्रसाद को-तूर, संजय टोणपे, शशिकांत घाडगे,अनिल घाडगे, बाळकृष्ण डिंगरे, सुनील जगताप, ओंकार कापसे, संजय कुलकर्णी, प्रवीण देशपांडे, डॉ. श्रीधर यलमार, रविराज सोनार, मंदार केसकर, प्रताप चव्हाण, रामेश्वर कोरे, अजित खिलारे, गणेश काकरंबे, पार्थ गायकवाड, प्रशांत डोंगरे, कीर्ती मोरे, महानंदा डोंबाळे, अंजू सूनगार,दिपाली सतपाल,डॉ.क्षितिजा कदम पाटील तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, सहकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांनी अत्यंत जबाबदारीने काम करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
–महेश भंडारकवठेकर ३०-०८-२०२६–
Post Views: 19