सोलापूर : पत्रा तालीम येथील कै. मुरलीधरजी घाडगे पैलवान सभागृहात सायंकाळी ७ वाजता लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत सन २०२६-२७ या वर्षासाठी महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड दत्ता भोसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
यावेळी उत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱ्यामध्ये उपाध्यक्षपदी गिरीष शेंगार व दादा सुरवसे, कार्याध्यक्षपदी महेश धाराशिवकर, सचिवपदी ओंकार जाधव, खजिनदारपदी प्रवीण जाधव, मिरवणूक प्रमुखपदी राजू हुंडेकरी, प्रसिद्धी प्रमुखपदी वैभव गंगणे व बसवराज कोळी, तर कार्यालयीन प्रमुखपदी सचिन स्वामी यांची निवड करण्यात आली.
यावेळी खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी परिवहन समिती सभापती राजन जाधव, श्रीकांत घाडगे, किशोर गादेकर, प्रा.ओंकार भुरळे, एडवोकेट मल्हार बन्ने, राजा सुरवसे, प्रसन्न गायकवाड, सौरभ कन्हेरी, महेश हजारे, चन्नेश इंडी, जितेश भुरळे, बसवराज गुब्याड, ज्ञानेश्वर बनसोडे, सोमनाथ बनसोडे यांची उपस्थिती होती.
बैठकीची प्रस्तावना प्रा.ओंकार भुरळे यांनी केली तर आभार प्रदर्शन सचिन स्वामी यांनी मानले..




















