अक्कलकोट – मतदार यादीत आपले नाव नसेल आणि इतर काही चुका झाल्या असतील तर त्वरित दावा करा आणि आपल्या मतदानाचा हक्क अबाधित राखा असे आवाहन तहसीलदार विनायक मगर यांनी केले आहे
पुनर्नरीक्षण मतदार यादी तयार झाली असून ती प्रसिद्ध करण्यात आली आहे मतदारांनी ती यादी पहावी आपले नाव तपासावे नावात चूक झाली का वय जन्मतारीख फोटो पत्ता आधी बाबत त्रुटी असतील तसेच मतदान केंद्र बरोबर आहे का याकडेही लक्ष ठेवावे नाव नसेल गायब असेल किंवा चुकीचे असेल तर ३० सप्टेंबर पर्यंत या संदर्भात दावा करावा कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्ती नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी परगावी गेलेले अशांची नावे काळजीपूर्वक तपासा सदरची मतदार यादी ही महाराष्ट्र शासनाने एसआयआर पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे ३० सप्टेंबर पर्यंत दावे दाखल करावेत त्याची सुनावणी होऊन त्याचे निराकरण २२ऑक्टोबर पर्यंत केले जाईल आणि त्यानंतर अंतिम यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे नवीन नाव नोंदणी वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी देखील संधी दिली जात आहे याशिवाय २०२५ मध्ये नाव होते मात्र २०२७ च्या यादीत नाव नाही अशांनी सीईओ एस आय आर पोर्टलवर स्वतंत्र तपासणी करावी तुम्ही अनुपस्थित स्थलांतरित दुबार म्हणून दाखवले गेले आहात का याचाही तपास करावा नावात चूक असेल गाव पत्ता वय फोटो यातील काही चूक असेल तरीही दुरुस्ती फॉर्म भरता येईल पडताळणी करताना आधार कार्ड जन्म पुरावा पत्त्याचा पुरावा २०२५ च्या यादीतील तपशील एक पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे आपले नाव मतदार यादी तपासणीसाठी शेवटच्या ३० सप्टेंबर २६ तारखेपर्यंत वाट न पाहता त्वरित आपले मतदार नाव तपासणीला प्रारंभ करा आणि आपल्या मतदानाचा राष्ट्रीय हक्क जपा असे आवाहन तहसीलदार विनायक मगर यांनी केले आहे
Post Views: 11