सोलापूर – पूजा-विधी, विवाहसोहळे, गृहप्रवेश, उपनयन, सत्यनारायण पूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये संस्कार, परंपरा आणि विधी यांचे प्रभावीपणे इंग्लिशमधून वर्णन करता यावे, यासाठी सारथी स्पोकन इंग्लिश, सोलापूर यांच्या वतीने पुरोहितांसाठी विशेष इंग्लिश फॉर प्रीस्टस स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण बॅच नुकतीच सुरू करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सारथी स्पोकन इंग्लिश, कन्ना चौक, सोलापूर (मो. ९८९०९२५९९६) येथे संपर्क साधावा.
सध्याच्या काळात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची व्याप्ती भारताबरोबरच परदेशातही वाढत आहे. त्यामुळे पुरोहितांना विधींचे महत्त्व, संस्कार, परंपरा आणि धार्मिक संकल्पना इंग्लिशमधून आत्मविश्वासाने समजावून सांगता याव्यात, या उद्देशाने हा विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमामध्ये पूजा-विधींचे इंग्लिशमधील सादरीकरण, संस्कार व धार्मिक परंपरांचे सोप्या इंग्लिशमध्ये स्पष्टीकरण, स्पोकन इंग्लिश व कम्युनिकेशन स्किल्स,प्रत्यक्ष संवादाचा सराव तसेच पुरोहितांसाठी उपयुक्त विशेष अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध धार्मिक विधी, संस्कार व परंपरांशी निगडित महत्त्वपूर्ण मराठी-इंग्लिश शब्दांचा समावेश असलेली विशेष *मराठी-इंग्लिश धार्मिक शब्दकोश पुस्तिका* देण्याचा सारथी स्पोकन इंग्लिशचा मानस आहे. या पुस्तिकेमुळे पुरोहितांना धार्मिक विधींशी संबंधित योग्य इंग्लिश शब्दसंपदा आत्मसात करून त्यांचा प्रत्यक्ष सेवेत प्रभावीपणे वापर करता येणार आहे.
या प्रशिक्षणामुळे पुरोहितांना इंग्लिशमध्ये विविध विधींचे आत्मविश्वासाने स्पष्टीकरण देता येणार असून, भारतातील तसेच परदेशातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांची संवादक्षमता अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. व्यक्तिमत्त्व विकास आणि संवादकौशल्यातही यामुळे सकारात्मक सुधारणा होणार आहेत.
सारथी स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून सन २००४ पासून इंग्लिश प्रशिक्षणाचे कार्य सुरू असून, सारथीचे मुख्य प्रशिक्षक प्रा. विठ्ठल वंगा यांना इंग्लिश प्रशिक्षणाचा ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांसाठी हा विशेष अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.
बदलत्या काळाची गरज ओळखून पुरोहितांनी इंग्लिश संवादकौशल्य आत्मसात करून आपल्या धार्मिक सेवेला आधुनिक आणि अधिक प्रभावी स्वरूप देण्यासाठी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 12