Thursday, September 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एसटीच्या सवलत कार्ड योजनेचा पहिल्याच दिवशी फज्जा; ज्येष्ठ नागरिक, महिलांना मनस्ताप

तरुण भारतbyतरुण भारत
September 3, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर सवलतीच्या प्रवाशांना तिकिटात सवलत देण्यासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या एसटीकार्ड योजनेचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले. कार्ड आणि एसटी महामंडळाच्या तिकीट मशीनमधील सॉफ्टवेअरचा ताळमेळ बसत नसल्याने प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग निर्माण झाले. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागल्याची तक्रार करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून सवलतीच्या प्रवाशांसाठी एसटीचे स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. हे कार्ड असेल तरच संबंधित प्रवाशांना तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कार्ड काढले. मात्र, प्रत्यक्ष प्रवास करताना कार्डचा मशीनमध्ये स्वीकार होत नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे महामंडळाकडून लाखो कार्ड वितरित करण्यात आले असताना अनेक बसस्थानकांवर कार्डमध्ये बॅलन्स टाकण्यासाठी किंवा त्याची प्रक्रिया करण्यासाठी मोजकीच मशीन उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कार्ड घेण्यासाठी आणि त्यामध्ये बॅलन्स भरण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या. यामुळे बसस्थानकांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
———————–
चौकट : ( परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालण्याची ग्राहक पंचायतीची मागणी )
एसटीच्या कार्डसाठी अतिरिक्त शुल्क, त्यामध्ये बॅलन्स भरण्याची प्रक्रिया आणि त्यावर आकारला जाणारा जीएसटी यामुळे सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भार पडत असल्याचेही ग्राहक पंचायतीने म्हटले आहे. एसटी महामंडळाने तातडीने या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, पुरेशा प्रमाणात मशीन उपलब्ध करून द्याव्यात आणि तोपर्यंत सवलतीसाठी कार्डची सक्ती करू नये आदी मागण्यांबरोबरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वत: जातीने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी, अशीही मागणी ग्राहक पंचायतीकडून करण्यात आली आहे.
———————–
चौकट : ( तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत जुनीपध्दतच वापरावी )
एसटी कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्ड काढले; मात्र त्या तुलनेत कार्डची प्रक्रिया आणि बॅलन्ससाठी आवश्यक मशीनची संख्या अपुरी असल्याने योजनेच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत जुन्या पद्धतीने सवलतीची तिकिटे देण्याची व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी प्रवाशांमधूनही होत आहे.
———————–
कोट
नवीन योजना सुरू करण्यापूर्वी महामंडळाने तिची पुरेशी चाचणी करणे आवश्यक होते. कार्ड, तिकीट मशीन आणि संबंधित सॉफ्टवेअर यांचा ताळमेळ व्यवस्थित आहे की नाही, याची प्रत्यक्ष चाचणी न करता थेट योजना लागू करण्यात आल्याने पहिल्याच दिवशी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. एकीकडे एसटी महामंडळाकडून प्रवाशी वाढविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी महामंडळाच्या अशा भोंगळ कारभारामुळे एसटीचे प्रवासी कसे वाढणार ?  शशिकांत हरिसाद ( सोलापूर जिल्हाध्यक्ष, ग्राहकपंचायत )
Post Views: 3
Previous Post

सारथी स्पोकन इंग्लिशची पुरोहितांसाठी इंग्लिश स्पीकिंगची विशेष बॅच सुरू

Next Post

सह्याद्री मध्ये बी व एम.फार्मसी प्रथम फेरीसाठीचे ऑपशन फॉर्म चालू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सह्याद्री मध्ये बी व एम.फार्मसी प्रथम फेरीसाठीचे ऑपशन फॉर्म चालू

ताज्या बातम्या

गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

September 3, 2026
मळोली येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते जलपुजन

मळोली येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते जलपुजन

September 3, 2026
माढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत  रस्ता रोको

माढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत  रस्ता रोको

September 3, 2026

‘महिला लोककला महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर

September 3, 2026
उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

September 3, 2026
रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक

रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक

September 3, 2026
बार्शीत मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन साजरा

बार्शीत मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन साजरा

September 3, 2026

२० सप्टेंबरपर्यंत मिळकतकरावर मिळणार सवलत

September 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1158715

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!