सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची बी.फार्मसी व एम.फार्मसी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया मध्ये आतापर्यंत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया झाली असून त्यानंतर प्रवेशसाठीची पहिल्या फेरीची प्रक्रिया ५ सप्टेंबर पासून चालू होणार असून त्याचे ऑपशन फॉर्म ५ ते ७ सप्टेंबर या दरम्यान भरायचे आहेत. तसेच द्वितीय, तृतीय, चौथी फेरी व इन्स्टिट्यूट लेव्हल प्रवेश फेरी यांचे वेळापत्रक शासनाने जाहीर केले आहे. तरी बी व एम.फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले, विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी डॉ.एन.ए.तांबोळी
(९४२२६४४८७६), प्रा.एस.एस.काळे (९८२२०४७२३६), प्रकाश पाटील (९८८१४३३६५८), पी.एस.लोखंडे (९८२३१०७३७१) यांना संपर्क करावा असे आवाहन प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी केले आहे.
चौकट-
प्रवेश प्रक्रिया संक्षिप्त वेळापत्रक-
प्रथम प्रवेश फेरीसाठी ऑपशन फॉर्म भरणे- ५ ते ७ सप्टेंबर, प्रथम प्रवेश फेरी लिस्ट- १० सप्टेंबर, फेरीत नंबर लागलेल्या अर्जदार विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्रवेशासाठी करावयाची प्रक्रिया- ११ ते १५ सप्टेंबर, द्वितीय प्रवेश फेरीसाठी ऑपशन फॉर्म भरणे- १७ ते १९ सप्टेंबर, तृतीय प्रवेश फेरीसाठी ऑपशन फॉर्म भरणे- २७ ते २९ सप्टेंबर, चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑपशन फॉर्म भरणे- ७ ते ९ ऑक्टोंबर, इन्स्टिट्यूट लेव्हल ऑप्शन फॉर्म भरणे- ११ सप्टेंबर ते १४ ऑक्टोंबर
Post Views: 9