सोलापूर – जैन समाजातील युवा उद्योजक व महिला उद्योजकांसाठी व्यवसाय वृद्धी व्हावी आणि नेटवर्किंगचे प्रभावी व्यासपीठ निर्माण करावे तसेच समाजातील वंचित आणि गरजू उद्योजकांना आवर्जून मदत करणे या उद्देशाने स्थापन झाले. रोम झोन जितोचे राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सोलापूर विभागाच्या अध्यक्षपदी इंजिनिअर अभय सुराणा यांची तर सरचिटणीस पदी अमित जैन यांची एकमताने निवड करण्यात आली.
सुप्रसिद्ध गुजराती भवन मध्ये संपन्न झालेल्या या सभेत जीतो अपेक्स चे डायरेक्टर राजेश कुमार सांकला आणि जितो अपेक्स चे अध्यक्ष विजय भंडारी उपस्थित होते. सोलापुरात जितो चॅप्टर सुरू करण्यासाठी अनेक वर्षापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप मिळालेले आहे यामुळे सोलापूरच्या उद्योजकांची निश्चितच भरभराट होऊन जगातला एक प्रभावी व्यासपीठ म्हणून पाहिले जात आहे.
जीतो म्हणजेच जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे इतर पदाधिकारी याप्रमाणे अशीत पंचमीया, सचिन भस्मे अनुक्रमे उपाध्यक्ष तसेच अमित कुमार जैन सरचिटणीस तसेच धीरज बलदोटा साहिल भंडारी प्रवीण वाणीगोता जॉइंट सेक्रेटरी तसेच प्रतीक शाह, महावीर कवाड़, अक्षय शिंगवी, पुष्कराज कोठारी, अभय गांधी हे सदस्य असा एकूणच मोठा डायरेक्ट बोर्ड ऑफ डायरेक्टर ग्रुप तयार करण्यात आलेला आहे.
तसेच या सभेमध्ये जितो च्या युवा विंगचे देखील निवड करण्यात आली यामध्ये चेअरमन म्हणून विनीत शाह, व्हाईस चेअरमन खुशी सुराणा, अभिषेक शाह यांच्या अनुक्रमे तर सरचिटणीस पदी यश जैन तसेच जीतो लेडीज विंगचे देखील या वेळी निवड करण्यात आली चेअरमन पदी आरती सुराणा, व्हाईस चेअरमन तेजल पोरवाल आणि जनरल सचिव पिंकी कवाड,
*बिझनेस वैद एथिक्स अँड कम्युनिटी सर्विस या विचारातून जीतो कार्यरत असून त्याची स्थापना 2007 मध्ये झाली आज देशभर आणि परदेशात मिळून एकूण 25 पेक्षा जास्त चाप्टर सुरू आहेत त्याचे एकूण 90 हजार पेक्षा जास्त उद्योजक व्यावसायिक सदस्य म्हणून जोडले गेलेले आहेत जितोच प्रमुख उद्देशच हा आहे की प्रत्येक सदस्याचा व्यवसाय वृद्धी होऊन आर्थिक सक्षम व्हावा आणि समाजातील वंचित घटक देखील जोडला जाऊन त्याची व्यवसाय वृद्धी व्हावी आणि तो मुख्य प्रवाहात यावा असा आहे.*