धाराशिव – करजखेडा येथील न्यू कनिष्ठ स्वतंत्र कला महाविद्यालय , करजखेडा येथे 17 सप्टेंबर 2026 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संस्था सचिव श्री प्रा. बाळासाहेब अणदूरकर सर , पैगंबर शेख सर, प्रा. विकास खापरे, प्रा. ओव्हाळ सर. , प्रा. ढमाले सर, श्री . सोकांडे सर, विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![न्यू कनिष्ठ [स्वतंत्र ] कला महाविद्यालय करजखेडा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा](https://i0.wp.com/dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2026/09/17-saptbar-01.jpg?resize=750%2C375&ssl=1)















