सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाची वार्षिक सर्वसाधारण सभा शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे अधिमन्यू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत समता सैनिक दलाच्या नूतरन जी.ओ.सी.पदी आकाशवाणीचे निवृत्त वर्ग 1 चे अधिकारी शांतीकुमार कांबळे यांची तर महासचिव पदी बाळासाहेब मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी अनिल जगझाप ,सहसचिव म्हणून कुणाल जानराव आणि खजिनदारपदी सुनील डांगे, सह खजिनदार म्हणून विनोद जाधव यांची निवड करण्यात आली. प्रमुख सल्लागार म्हणून अण्णासाहेब आलशंकर, सुधीर चंदनशिवे ,संभाजी तळभंडारे, विठ्ठल थोरे यांची निवड करण्यात आली. तर सांस्कृतिक विभागमध्ये सुमित्रा केरु जाधव ,सुनिता गायकवाड, सुचित्रा थोरे, सुशिला भालशंकर, शीला हावळे यांच्या निवडी करण्यात आल्या. हिशोब तपासणीस म्हणून प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांची तर कार्यकारिणी सदस्य पदी रत्नदीप कांबळे ,अरुण गायकवाड ,भारत आवारे, मुकुंद चंदनशिवे ,बाळासाहेब भोसले ,अंकुश बनसोडे, रमेश शिरसाट यांच्याही निवडी एकमताने करण्यात आल्या. येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नॉर्थकोट मैदानावर होणारा धम्म संस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्याचे सर्वानुमते ठरले. नूतन जीं ओ सी शांतिकुमार कांबळे यांचा विठ्ठल थोरे आणि आण्णासाहेब भालशंकर, सुधीर चंदनशिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी बाळासाहेब मस्के नूतन महासचिव यांनी सर्वांचे आभार मानले.
Post Views: 13