सोलापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती युवासेनेचे सोलापूर शहरप्रमुख तुषार आवताडे यांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात समाजाशी असलेले नाते जपताना सामाजिक बांधिलकीला विशेष महत्त्व दिले. त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प युवासेनेने केला असून, त्याचाच एक भाग म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून गरजू रुग्णाला जीवनदान देणारे महत्त्वपूर्ण कार्य आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, गर्भवती महिला तसेच विविध आजारांवरील उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी रक्ताची गरज भासत असते. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांनी आणि नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
“बाळासाहेबांच्या विचारांना अभिवादन, रक्तदानातून समाजसेवेचा संकल्प” या भावनेतून आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर रविवार दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी उपलप मंगल कार्यालय सात रस्ता येथे होणार आहे. तरी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा प्रमुख राम वाकसे जिल्हाप्रमुख रमेश चौगुले आणि युवासेनेचे शहरप्रमुख तुषार आवताडे यांनी केले आहे.
युवासेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवसैनिकांच्या सहभागातून हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
—–
Post Views: 20