माढा : रेल्वे सुरक्षा दलात उल्लेखनीय, धाडसी आणि प्रामाणिक सेवा बजावल्याबद्दल माढ्याचे रहिवासी आणि सध्या पुणे येथे कार्यरत असलेले विशाल माने यांना रेल्वे सुरक्षा दलाचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रेल्वे सुरक्षा दलाचा सर्वोच्च अंतर्गत सन्मान मानला जातो.
त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन होत आहे.
या पुरस्काराचे महत्त्व – हा पुरस्कार रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकांकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.रेल्वेची सुरक्षा, प्रवाशांचे संरक्षण आणि रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची या पुरस्काराद्वारे दखल घेतली जाते, गुन्हे प्रतिबंध, धाडस, प्रामाणिकपणा आणि कर्तव्याप्रती असलेले समर्पण या गुणांचा हा गौरव आहे नेहमीच्या कर्तव्यापेक्षा अधिक जबाबदारीने आणि निष्ठेने काम करणाऱ्या पात्र रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे सुरक्षा विशेष दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा सन्मान दिला जातो.सामान्यतः संपूर्ण सेवाकाळात हा पुरस्कार एकदाच दिला जातो, त्यामुळे या पुरस्काराचे विशेष महत्त्व आहे.कर्तव्यावरील शिस्त, तत्परता आणि सेवाभाव यामुळे विशाल माने यांनी हा बहुमान प्राप्त केला आहे. त्यांच्या कार्याचा आलेख असाच उंचावत राहो, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी भावना व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
Post Views: 8