बार्शी – शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन (एनजीओ), कोल्हापूर यांच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय “गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६” साठी बार्शी येथील प्रा. पांडुरंग भगवान घाडगे यांची निवड करण्यात आली आहे. श्री. घाडगे हे चाटे शिक्षण समूह, बार्शी येथे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थी केंद्री उपक्रम तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी पाठविलेल्या निवडपत्रानुसार, संस्थेच्या निवड समितीने प्रा. घाडगे यांची गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड निश्चित केली आहे. हा पुरस्कार रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्रशाला, मोरारजी पेठ, सोलापूर येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे बार्शीच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था, सहकारी, विद्यार्थी व पालकांकडून श्री. पांडुरंग घाडगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
Post Views: 30