अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात शुक्रवारी सायंकाळी ७ वा. अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.*
*या प्रसंगी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचा सत्कार करण्यात आला. न्यासाचे सचिव शामराव मोरे काका व विश्वस्त, पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले हे उपस्थित होते.*
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथील शमीवृक्षाखाली गेल्या ३३ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमीविघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.
यावेळी पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, मनोज निकम, वैभव मोरे, निखिल पाटील, अतिश पवार, प्रवीण देशमुख, शुभम सावंत, मुख्य आचारी बाळासाहेब पोळ, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, अनिल गवळी,अप्पा हंचाटे, मल्लिकार्जुन बिराजदार,दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, सिध्दाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, सुमित कल्याणी, राहूल इंडे शिवाजी गायकवाड, किरण साठे, बसवराज क्यार, बिरप्पा व्हनझेंडे, रोहन शिर्के, आकाश गडकरी,स्वामिनाथ बाबर, श्रीकांत स्वामी, धानप्पा उमदी,राजू पवार,रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, विलासराव रेड्डी, काशिनाथ वाले, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विलासराव देशमुख, सुरेश प्रधान, धनंजय गोंडाळ, श्रीकांत स्वामी, लक्ष्मण हिळळी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकट :
शनिवार दि.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा. न्यासाचे क्रियाशील सदस्य मनोज निकम यांच्या हस्ते श्रींची पूजा आयोजित करण्यात आली आहे.
चौकट :
श्री गणेश अथर्वशीर्ष पठण-
रविवार दि.२०सप्टेंबर २०२६ रोजी महिलांचे सामुदायिक श्री गणेश अथर्वशीर्ष पठण सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
Post Views: 21