सोलापूर – मासे पकडण्यासाठी सीना नदीच्या पाण्यात उतरलेल्या एका मच्छीमाराचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथे आज रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
येडू जयराम भोई (वय 45 वर्ष, रा. तिर्हे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे आज रविवारी सायंकाळी गावातील सीना नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते आणि मासे पकडण्याच्या जाळ्यात पाय अडकून ते पाण्यात बुडाले. नातेवाईकांच्या साह्याने त्यांना पाण्यातून बाहेर काढून येथील शासकीय रुग्णालयात रात्री पावणे नऊ वाजता भाऊ तुळजाराम यांनी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Post Views: 12