सोलापूर – शालेय शहर टेबल टेनिस स्पर्धेत के. एल. ई. स्कूलने १४ वर्षांखालील मुले, मुली आणि १७ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद मिळवत तिहेरी मुकुट पटकावला.
मुळे पॅव्हेलियन टेबल टेनिस हॉल येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत शहरातून १४, १७ आणि १९ वर्षांखालील (मुले व मुली) विविध गटांमधून २७ संघांनी सहभाग घेऊन आपले उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवले.
सोलापूर महानगरपालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. स्पर्धा पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव झेड. एम. पुणेकर, श्री. मुनोळी, श्री. गोवर्धन, श्री. मुंढे, श्री. माळवादकर, प्रथमेश हिरापुरे, नामदेव, भांडेकर यांचे सहकार्य लाभले.
अंतिम निकाल :
- १४ वर्ष वयोगट मुले: के. एल. ई. प्रशाला विजयी विरुद्ध एस. आर. चंडक विद्यालय). मुली : के. एल. ई. स्कूल विजयी विरुद्ध महेश इंग्लिश मीडियम स्कूल
- १७ वर्ष वयोगट मुले : के. एल. ई. प्रशाला विजयी विरुद्ध सेंट जोसेफ प्रशाला. मुली : एस. आर. चंडक विद्यालय विजयी विरुद्ध के. एल. ई. प्रशाला)
- १९ वर्ष वयोगट मुले: एच. एन. कॉलेज ऑफ कॉमर्स विजयी विरुद्ध एस. आर. चंडक विद्यालय. मुली : एच. एन. कॉलेज ऑफ कॉमर्स विजयी विरुद्ध एस. आर. चंडक विद्यालय.
- ———























