सांगोला – जवळा येथील विकास सेवा सोसायटीचे नाव गेल्या अनेक वर्षापासून ऐकत आलो होतो. मात्र या संस्थेला प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला. या संस्थेचे कामकाज अत्यंत उत्कृष्ट असून राज्यातील अन्य सहकारी संस्थांनी या विकास सेवा सोसायटीचा आदर्श घ्यावा असे गौरवोद्गार सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी काढले. त्यांनी सांगोला तालुक्यातील जवळा विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला भेट देऊन संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील, पं.स.सभापती पुनम इंगवले, सहा.निबंधक डॉ.वैशाली साळवे, सोलापूर जि.प.च्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, चारुशिला काटकर, बाळासाहेब एरंडे, नगरसेविका तनुजा एरंडे, अशोक शिंदे, शहाजीराव नलवडे, तानाजी पाटील, सरपंच सज्जन मागाडे, अरुण घुले, प्रशांत वलेकर, सदाशिव साळुंखे, विजय येलपले, डॉ.राज मिसाळ, कृष्णदेव खांडेकर, संस्थेचे चेअरमन सुनील साळुंखे, सचिव संजय साळुंखे, संचालक, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक दीपकआबा साळुंखे पाटील, सुत्रसंचालन बाळासाहेब शिंदे, आभार प्रदर्शन विलास घुले यांनी केले.
चौकट-
राज्यात अनेक विकास संस्था तोट्यात असताना माजी आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा विकास संस्थेने मात्र १०० टक्के वसुली बरोबरच सोनेतारण, पिग्मी, स्वस्त धान्यातून लोकांना धान्य वाटप करणे, अशाप्रकारे चांगल्या पद्धतीने संस्था चालवली जाते ही निश्चितच समाधानाची बाब आहे.
-सहकारमंत्री बाबासाहेब पाटील