त्या परिस्थिती मध्ये पंढरपूर शहराचा विकास होणे. तिथल्यापायाभूत सुविधांचा विकास होणे, आलेल्या वारकऱ्यांसाठी सुविधा उभा करणे या बरोबरच त्यासोबत भविष्यातील पन्नास वर्षाचा हिशोब ठेवून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा हिशोबबांधून पंढरपूर शहर हे आपणाला मजबूत व्यवस्थेसाठीसंपन्न करावे लागणार आहे. त्यामुळे पंढरपूर कारिडोर होणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषगांनेहा काँरिडोर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. त्यामुळे पंढरपूर पालिकेतील सर्व नगरसेवक सुज्ञ आहेत. नगरपालिकेतील जनता सुज्ञ आहे. त्यामुळेनिश्चितच ते चांगला निर्णय घेतील. परमेश्वर देखील त्यांना सुबुध्दी देईल, विठुरायालादेखील त्यांना कानामध्ये येवुन चांगले सांगतील अशी आपली भावना आहे. त्यामुळे ठराव काहीहीझाला तरी देखील काँरिडोरचे काम थांबणार नाही. दरम्यान जमीन अधिग्र
हणांच्या शासनस्तरावरील सर्व प्रक्रिया पुर्णझालेल्या आहेत. शेवटचा कँबिनेट निर्णय झालेला आहे. त्यांच्या नोंटस होवून त्या संदर्भातीलशासन निर्णय देखील आलेला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात अधिग्रहणाची प्रक्रिया सुरुहोईल. तिथल्या संभाव्य बाधितां समोर चर्चा होईल आणि त्या नंतर टप्प्या टप्पाने अधिग्रहणाचेहे काम सुरु होईल अशी देखील माहिती पालकमंत्री गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.-






















