अक्कलकोट : देवभूमी रंगारेड्डी, हैद्राबाद (तेलंगाना) येथे श्री शारदा सर्वज्ञ पीठाधीश्वर अनंत श्री स्वामी अमृतानंद देव तीर्थ जी महाराज श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्यजी महाराज यांच्या चातुर्मास व्रत निमित्त श्री शारदा सर्वज्ञ पिठ्म यांच्या वतीने श्री शारदा शताब्दी सन्मान समारोह- २०२६ या कार्यक्रमात धार्मिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी बद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष – जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्यजी महाराज यांच्या हस्ते सदर संस्थेच्या वतीने विशेष प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.*
या सन्मान सोहळ्यास तेलंगणाचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पंकज मित्तल, श्री दत्त क्षेत्र कुरमपूर येथील आचार्य, श्री कशीविद्वत परिषद वाराणसीचे महामंत्री प्रो. रामनारायण दिवेदी, सर्वज्ञ पीठ या न्यासाचे व्यवस्थापक – डॉ. राजा लंगरजी, न्यासाचे महासचिव आचार्य मदनजी हे उपस्थित होते.
श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्यजी महाराज यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष – जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व त्यांचे नातू कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे, यांना आशीर्वाद दिले. दरम्यान श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्यजी महाराज यांचा सत्कार श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, प्रसाद देऊन करण्यात आला. या बरोबरच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक, रेखीव प्रतिमा देण्यात आली.
चौकट:
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद-*
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची पावन पुण्य भूमी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे सुरु असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे महाराष्ट्रासह, अन्य राज्य व परदेशात कार्याने प्रसिद्ध आहे. दररोज या मंडळाच्या माध्यमातून शेकडो स्वामी भक्तांना महाप्रसाद दिला जातो. त्यांचे विविध उपक्रम उल्लेखनीय आहेत. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष – जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले हे अन्नछत्र मंडळ समर्थ पणे चालवीत आहेत.
शिवप्रताप शुक्ला
महामहिम- राज्यपाल तेलंगाना, हैद्राबाद
चौकट :
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य जाणून आहे-*
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तीर्थ क्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून स्वामी भक्तांना उत्कृष्ट सोयी-सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष – जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्कृष्ट व्यवस्थापन सुरु आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती- पंकज मित्तल
चौकट :
*धार्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट न्यास-*
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, श्री स्वामी समर्थांची तीर्थ क्षेत्र अक्कलकोट नगरीत अन्नदान सेवेबरोबरच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी सुरु आहे. दररोज शेकडो भाविकांना गेल्या ३९ वर्षापासून महाप्रसाद दिला जात आहे. राज्यासह परराज्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले हे स्वामी कार्याने दूर पर्यंत पोहचले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन देवभूमी रंगारेड्डी, हैद्राबाद (तेलंगाना) येथे श्री शारदा सर्वज्ञ पीठाधीश्वर अनंत श्री स्वामी अमृतानंद देव तीर्थ जी यांच्या वतीने श्री शारदा शताब्दी सन्मान समारोह- २०२६ ने सन्मानित करण्यात आले आहे.
श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्यजी महाराज
देवभूमी रंगारेड्डी, हैद्राबाद (तेलंगाना)
चौकट :
*स्वामी सेवकाचा सन्मान –*
देवभूमी रंगारेड्डी, हैद्राबाद (तेलंगाना) येथे श्री शारदा सर्वज्ञ पीठाधीश्वर अनंत श्री स्वामी अमृतानंद देव तीर्थ जी महाराज श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्यजी महाराज यांच्या चातुर्मास व्रत निमित्त श्री शारदा सर्वज्ञ पिठ्म यांच्या वतीने श्री शारदा शताब्दी सन्मान समारोह- २०२६ या कार्यक्रमात धार्मिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी बद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष – जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्यजी महाराज यांच्या हस्ते सदर संस्थेच्या वतीने विशेष प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. हा सन्मान म्हणजे स्वामी सेवकाचा सन्मान आहे.
श्री दत्त क्षेत्र कुरमपूर येथील आचार्य
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष – जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना कार्यक्रम स्थळी पोहचण्याकरिता वाहतूक कोंडीमुळे अशक्य झालेले होते. पोहचण्याकरिता विलंब झाला. मात्र या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून करीत असलेल्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी केला.
चौकट :
*श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्यजी महाराजांकडून झालेला सन्मान कधी न विसरणारा-*
गेल्या ३९ वर्षामध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अविरत स्वामी भक्तांची सेवा अन्नछत्र मंडळ परिवाराकडून होत आहे. या संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबरच विविध लोकाभिमुख उपक्रम हाती घेण्यात आले. त्यामध्ये सातत्य असून, या सर्व कामाची दखल शेजारच्या राज्यातील देवभूमी रंगारेड्डी, हैद्राबाद (तेलंगाना) येथे श्री शारदा सर्वज्ञ पीठाधीश्वर अनंत श्री स्वामी अमृतानंद देव तीर्थ जी महाराज श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्यजी महाराज यांच्या चातुर्मास व्रत निमित्त श्री शारदा सर्वज्ञ पिठ्म यांच्या वतीने श्री शारदा शताब्दी सन्मान समारोह- २०२६ मध्ये मला सन्मानित करण्यात आले हे माझे भाग्य असून, श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्यजी महाराजांकडून झालेला सन्मान कधी न विसरणारा आहे.
जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले
संस्थापक अध्यक्ष
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट
या कार्यक्रमास बाबा बोडखे, पुणे, हैद्राबाद भाजपा जिल्हाध्यक्ष- नितीन नंदकर, हर्षद ठाकूर, रोहित खोबरे, अश्पाक काझी, शिवराज स्वामी, सर्फराज शेख, महांतेश स्वामी, श्रीशैल कुंभार, शुभम इंगळे, गोकुळ पाटील, गोपाळ वाकडे, असद फुलारी यांच्यासह देवभूमी रंगारेड्डी, हैद्राबाद येथील स्वामी भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.