सांगोला – ग्रामीण भागात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत मोठ्या आवाजामुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर चोपडी (ता.सांगोला) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अनोखा आणि अनुकरणीय निर्णय घेत डीजे व कर्णकर्कश संगीताला फाटा देत भजनाच्या तालावर श्री गणरायाचे विसर्जन केले. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने मंडळाने हा निर्णय घेतला. ज्ञानोबा-तुकाराम आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण चोपडी परिसर भक्तिमय झाला होता. कोणताही कर्णकर्कश आवाज, दिखावा किंवा बेधुंद नाच न करता भक्तिभावाने पार पडलेली ही विसर्जन मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
Post Views: 14