वळसंग – तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत नुकताच दिलीप चौधरी सरांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान संपन्न झाला. या व्याख्यानात सत्कृत्य, आईवडिलांची सेवा, गुरुजनांची सेवा आणि आरोग्य या विषयावर हसत खेळत विविध पैलूवर उदाहरण देत विद्यार्थ्यांना समजेल या परीने व्याख्यान दिले. या व्याख्यानात प्रशालेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक व्याख्यान ऐकण्यात मंत्रमुग्ध झाले होते आणि मनमोराधपणे हसले अशा तऱ्हेने व्याख्यान संपन्न झाला. या व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक वीरेश थळंगे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे पर्यवेक्षक शिवानंद घोडके, मराठीचे अध्यापक तानाजी जमादार आणि गणेशोत्सव समितीचे कोषाध्यक्ष नीलकंठ कवटगी, मिरवणूक प्रमुख सिद्धारूढ हिरेमठ, गंगाधर बिराजदार, विजयकुमार प्याटी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयालक्ष्मी थळंगे शैलजा निंबाळ, गंगा बागलकोटी, गौरीशंकर चनशेट्टी, कट्टेप्पा कोळी, इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आणि आभार अनुक्रमे श्रीमंत भोसले आणि तानाजी जमादार यांनी मानले.
Post Views: 66