वळसंग – वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील गावाचा सर्वांगीण विकासाचा आढावा घेणा-या ग्राम समृद्धी पुस्तकीचे प्रकाशन वळसंग वाडा येथे मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. या पुस्तिकेत वळसंगचा इतिहास,वर्तमान व भविष्याचा वेध घेण्यात आला आहे. वळसंग साठी नाम फाउंडेशन, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट, सकाळ माध्यम समूह व शासनाच्या माध्यमातून लोकसभागातून जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली आहे याचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असे प्रतिपादन यशदाचे उपमहासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. या पुस्तकीत वळसंगच्या धार्मिक स्थळांचा उल्लेख, इतिहास व वळसंग वाड्याचा उल्लेख केल्यामुळे येथील पर्यटनात निश्चितच वाढ होईल असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) अंजली मरोड यांनी सांगितले.यावेळी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अंजली मरोड,सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांच्यासह सरपंच जगदीश अंटद ,माजी सरपंच श्रीशैल दुधगी , माजी सरपंच सिद्धाराम कोडले यांच्यासह सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्धारूढ काळे , सुनील बाबानगरे,अनुपमा बाबानगरे, रमेश चौगुले, श्रीशैल कण्णगी, चनबसप्पा खैराटे, बसवराज कलशेट्टी, प्रतिभा दुधगी, ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार जाधव, कृषी सहाय्यक गुलाब राठोड, रवी कलशेट्टी,वीरेश बागलकोटी,बसवराज दुधगी, मल्लिनाथ ढब्बे, सिद्धाराम तिपराधी, सिद्धाराम वाघमारे , अल्ताफ पटेल, कल्लय्या स्वामी ,अजय काळे, शिवशरण बिराजदार, अँड, मुश्ताक मणुरे,महांतेश खैराटे,धानप्पा कण्णगी,योगेश चनशेट्टी, संजीव माणकोजी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी डॉल्बीमुक्त सोलापूर, गाळमुक्त तलाव गाळ युक्त शिवार व सकाळ ग्राम समृद्धी पुस्तकाविषयी आपले विचार व्यक्त केले. जाहिरात विभागाचे व्यवस्थापक अभयकुमार सुपाते, संतोषकुमार सावळगी, जाहिरात प्रतिनिधी महेश भुयारे यांनी उपस्थित त्यांचे स्वागत केले. पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अल्ताफ पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post Views: 22