सोलापूर – गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे अध्यक्ष डॉ सुर्य प्रकाश कोठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ अरूणा हावले व डॉ दिलीप दासरी यांनी रूग्णांची तपासणी केली. मंडळाचे अध्यक्ष जगपती मिठ्ठा यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शिबीरात महिला व मुलींचे रक्त पातळी प्रमाण अर्थात हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आले जवळपास 90 टक्के महिला व मुलींच्या रक्तातील रक्तपातळी प्रमाण कमी असल्याने मोफत औषधांचा पुरवठा करण्यात आले. या शिबिराचे आय सेन व सन फार्मा कंपनीसह विविध कंपन्यांत मार्केटिंग एक्झिक्युटिव्हचे काम पाहणारे प्रमोद मार्गम, सुशांत शेंडगे, माधव कोंगारी, दिनेश तडका, साईकिरण बोध्दूल, राजू अहवाल, श्रीनिवास अरकाल, विनित शेंडगे, अक्षय शेंडगे, हिरालाल माकम, राघवेंद्र मेडिकल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश दोंता यांनी केले. मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.






















