पंढरपूर – एकीकडेसोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे कोणत्याही परिस्थितीत कॉरिडॉर होणारचअशी ठाम भूमिका व्यक्त करीत पालिकेत नगरसेवकांनी स्थगित ठेवलेल्या विषयाला मंजुरी मिळावीयासाठी विठुरायाच त्यांना सुबुध्दी देतील अशी प्रार्थना करीत आहेत. तर दुसरीकडे येथीलविठ्ठल मंदिर परिसरातील संभाव्य बाधित मंडळींनी गणेशोत्सवात आगळीवेगळी गणेशमुर्ती साकारुनतो चक्क जेसीबी मशीन पायाने धुडकावून लावतानाचा देखवा सादर केला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचाकॉरिडॉरबाबतच निर्धारविठुराया पुर्ण करतो की बाधित मंडळींनी साकरलेले बाप्पा जेसीबी मशिन कायमचीच धुडकावूनलावतात या बद्दलची चर्चा सध्या येथे रंगताना ऐकावयास मिळत आहे. काशी व उज्जैनच्य धर्तीवर शासनाकडूनपंढरपूर कॉरिडॉर राबवण्यात येत आहे. या कॉरिडॉरमुळे मंदिर परिसरातील सुमारे ६५० जण बाधित होणारअसले तरी पंढरपूर शहराचा व परिसराचा विकास देखील होणार असल्याचे शासन ठणकावूनसांगत आहे. आत्ता पर्यंतचा सर्वाधिक दर देवूनबाधितांचे योग्य पुर्नवसन केले जाणार आहे असल्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री सांगत आहेत.त्यामुळे प्रशासनाकडून बाधित मंडळींची यादीदेखील तयार करण्यात आली आहे. दरम्यान भूसंपादनाचा विषय गणेशोत्सवानंतर हाती घेतला जाणार आहे. मात्र, तत्पुर्वीपंढरपूर नगरपरिषदेच्या विशेष बैठकीत कॉरिडॉर भूसंपादनाचा विषय तहकूब करण्यात आलाआहे. त्यामुळे नगरपरिषद देखील कॉरिडॉर बाधितांच्या पाठीशी असल्याचे दिसत आहे. कॉरिडॉरलाविरोध दर्शवत येथील संभाव्य बाधित मंडळींनी तयारकेलेली जेसीबी मशीन पायाने धुडकावून देणारी आगळीवेगळी गणेशमुर्ती चर्चेत आली आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे यांनी पालिकेचा ठराव होवो की न होवो शासनालाकाहीही फरक पडत नाही कॉरिडॉर होणारच असे सांगत पालिकेतील सर्व नगरसेवकांना विठुरायानेचसुबुध्दी द्यावी अशी प्रार्थना देखील आपण विठुरायाला करीत असल्याचे सूचक विधान रविवारी(दि.२०) केलेले आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्व
भूमीवरविठ्ठल मंदिर परिसरातील सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाने साकारलेले बाप्पा बाधितांना पावणारकी पालकमंत्र्याचा निर्धार विठुराया पुर्ण करणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
———————
चौकट 🙁 संभाव्य बाधितांना मिळाले हत्तीचे बळ )
पंढरपूर पालिकेतील सर्वसाधारण
सभेतसत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकांनी एकमुखाने कॉरिडॉर भूसंपादनाचा विषयस्थगित ठेवला आहे. त्यामुळे कॉरिडॉरबाधित मंडळींसाठीलढा उभा केलेल्या येथील तीर्थक्षेत्र बचाव समितीला हत्तीचे बळआले आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
———————
चौकट : ( गणेशोत्सवाच्या उपक्रमातू
नप्रकल्पाला विरोधाची भूमिका ) गणेशोत्सव काळात तीर्थक्षेत्र बचावस
मिती व पंढरपूर बचाव कृती समितीने कॉरिडॉरला विरोध करीत कॉरिडॉरहा विकास नव्हे तर विध्वंस असल्याचे बिंबवण्याचे काम सुरु केले आहे. गणेशोत्सवातगणेश मंडळाच्या देखाव्यापुढे कॉरिडॉरला विरोध दर्शवणारे देखावे, नो कॉरिडॉर नोडिपी, कॉरिडॉरचीपोलखोल म्हणत पंढरीचा विकास की विनाश? या अंतर्गत त्यांच्याकडून चर्चा सत्र, प्रश्नोत्तरांच्याकार्यक्रमांचे दखील आयोजन करण्यात आले आहेत.
Post Views: 10