अकलूज – माळशिरस तालुक्यात सोमवारी काही भागात तर आज अकलूज व परिसरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे गेल्या दोन महिन्याच्या प्रत्यक्ष नंतर प्रथमच मोठा पाऊस पहावयास मिळाला वेळापूर माळखांबी,निमगाव,तांदुळवाडी, खंडाळी,शंकरनगर,उघडेवाडी,गिरझणी, नातेपुते, तांबेवाडी, बोंडले,वाघोली आदी गावात सुमारे अर्धा तास चांगला पाऊस झाला. भागात हा आजचा चांगला पाऊस झाला पहाटे आणि सकाळी दहाच्या सुमारास नंतर दुपारी चार वाजता आणि रात्रभर बारीक पाऊस चालूच आहे प्रथमच मोठा पाऊस आल्याने वेळेला विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल मात्र या पावसाने गेलेले खरीप पिक उपधारी येणार नाही आणि तुटून जाणारे ऊसही वाढणार नाहीत कारण पंधरा ते वीस दिवसात साखर कारखाने चालू होतील
माळशिरस तालुक्यात गेली सुमारे २ महिने पावसाने पूर्ण दडी मारल्यामुळे तालुक्यातील खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे.सुमारे ३७/३८ अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानाने दिवसभर प्रचंड अस्वस्थता पसरली असायची.हवामान खात्याच्या वेगवेगळ्या अंदाजानुसार लोक मोठ्या अपेक्षेने विश्वास ठेऊन आशेवर जगत होते., मात्र या पावसाने दिलासा मिळाला आहे काही ठिकाणी ओढ्याला पाणी आले आहे
Post Views: 94