मंगळवेढा – मंगळवेढा शहरातील तहसिल कार्यालय व न्यायालयाकडे जाणार्या मार्गावर दोन्ही बाजूला रस्त्यावर असंख्य मोटर सायकली आडव्यातिडव्या उभ्या राहत असल्यामुळे वाहतूकीस मोठा अडथळा होत असल्याच्या तक्रारीवरुन वाहतूक शाखेच्या पोलीसांनी सदर मोटर सायकलीवर दंडात्मक कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवेढा तहसिल कार्यालय व न्यायालय,डी.वाय.एस.पी. कार्यालय आदी महत्वाची कार्यालये एकाच मार्गावर असून या मार्गावर ऑनलाईन केंद्र,झेरॉक्स सेंटर,स्टॅम्प विक्रेते,हॉटेल आदी असंख्ये दुकाने या मार्गावर असल्यामुळे येणारे प्रत्येक ग्राहक रस्त्यावर आडवीतिडवी वाहने व मोटर सायकली उभा करत असल्यामुळे वाहतूकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी मंगळवेढा पोलीस प्रशासनास प्राप्त झाल्या नंतर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सुरज साळुंखे यांनी सदर ठिकाणी येवून रस्त्यात व दुकानासमोर उभारणार्या वाहनावर कारवाई करण्यास प्रारंभ केल्याने वाहन चालकामधून मोठी खळबळ उडाली आहे. तसेच कारवाई होत असल्याचे दिसताच क्षणी काहींनी आपल्या गाड्या घेवून पळ काढल्याचे विदारक चित्र पहावयास मिळाले. याच मार्गावर मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय असल्याने दवाखान्यात येणार्या अॅम्ब्यूलन्सलाही ही वाहने अडथळा ठरत होती. वाहनावर आज कारवाई केल्यामुळे हा रस्ता सुटसुटीत मोकळा झाल्याने सुज्ञ नागरिकांनी या बाबत समाधान व्यक्त करुन यापुढे ही वाहतूक शाखेच्या पोलीसांनी या मार्गावर उभा राहणार्या वाहनावर कारवाई करुन मार्ग कायम मोकळा रहावा याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
Views: 117