सांगोला – कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले (सरकार) कनिष्ठ महाविद्यालय, जवळे (ता.सांगोला) येथील विद्यार्थ्यांनी सांगोला तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत १२ कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१४ वर्षे मुली वयोगटात ३३ किलो वजनी गटात ज्ञानेश्वरी सरगर हिने प्रथम, १७ वर्षे मुली वयोगटात ४३ किलो वजनी गटात ऋतुजा भजनावळे, ४९ किलो वजनी गटात संस्कारी गावडे आणि ५७ किलो वजनी गटात पूजा बुरंगे यांनी प्रथम, ५३ किलो वजनी गटात मयुरी आगलावे हिने तृतीय, १९ वर्षे मुली वयोगटात ५० किलो वजनी गटात गौरी येणपे हिने प्रथम, ५३ किलो वजनी गटात अक्षदा गावडे हिने तृतीय, १७ वर्षे मुलगे (फ्रीस्टाईल कुस्ती) वयोगटात ५५ किलो वजनी गटात प्रणय मस्के, ६० किलो वजनी गटात संस्कार बुरंगे, ८० किलो वजनी गटात पियुष गावडे यांनी प्रथम, १९ वर्षे मुलगे (ग्रीको-रोमन कुस्ती) वयोगटात ५५ किलो वजनी गटात यशवंत आगलावे, ६३ किलो वजनी गटात हेमंत आगलावे, ८२ किलो वजनी गटात ओम कोडक, ९४ किलो वजनी गटात दीपक सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेतील स्थान निश्चित केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ.दिपकआबा साळुंखे-पाटील, उपाध्यक्ष अरुण घुले, सचिव सुभाष लऊळकर, प्राचार्य बाळासाहेब शिंदे, उपमुख्याध्यापक प्रशांत गोरे, पर्यवेक्षक संतोष शेटे यांनी यशस्वी कुस्तीपटूंचे अभिनंदन केले. स्पर्धेसाठी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अशोक पाटील, विजय चडचणकर, विजय लांडगे तसेच प्रशिक्षक कुलभूषण देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
चौकट-
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत गौरी येणपे प्रथम
इ.१२ वीतील गौरी जितेंद्र येणपे हिने १९ वर्षांखालील वयोगटातील ४८ किलो वजनी गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत तिची विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून इ.११ वीतील पूजा म्हाळू बुरंगे हिने १७ वर्षांखालील वयोगटातील ५६ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.