सोलापूर – वाढते प्रदूषण आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे याची जाणीव ठेवून मनुष्याला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र भूषण डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी धर्माधिकारी व डॉ श्री सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव काळात सर्वत्र निर्माल्य संकलन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील पंढरपूर बार्शी कुर्डूवाडी अकलूज श्रीपुर वेळापूर या ठिकाणीही निर्माल्य संकलनाचे नियोजन आहे.
सोलापूर शहरांमध्ये ज्या ठिकाणी गणेश विसर्जन आहे त्या त्या ठिकाणी पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील सिद्धेश्वर तलावाच्या गणेश घाट व विष्णू घाट या ठिकाणी तसेच कंबर तलावातील गेट क्रमांक एक दोन व तीन या तिन्ही ठिकाणी तसेच विडी घरकुल सागर चौक मधील म्हाडा विहीर आणि तळे हिप्परगा येथे निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे यामध्ये प्रतिष्ठानचे जवळपास 1800 श्री सदस्य सहभागी होऊन निर्माल्य संकलन करणार आहेत. शहरातील सर्व गणेश भक्तांनी या निर्माल्य संकलन करणाऱ्या श्री सदस्यांकडे आपले पूजेतील निर्माल्य देऊन सहकार्य करावे व पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात येत आहे.
यापूर्वी प्रतिष्ठान तर्फे संकलन करण्यात आलेल्या निर्माल्याचे रे नगर येथे उत्तम प्रतीचा सेंद्रिय खत तयार करून रे नगर येथे प्रतिष्ठान तर्फे लावलेल्या जवळपास 4500 झाडांना व अनेक शेतकऱ्यांना त्याचे वाटप करण्यात आले.























