अक्ककलकोट – अक्कलकोट तालुक्यात पावसाअभावी नदी नाले ओढे कोरडे आहेत . पावसाअभावी पिक जळाली आहेत . शासनाने तात्काळ अक्कलकोट तालुका दुष्काळ
. जाहिर करावा . अक्कलकोट शहराला पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना कराव्यात . दुष्काळामुळे शेतकऱ्याना सरसकट कर्जमाफी करावी . .२०२५ अतिवृष्ठी मधील शासकीय पंचनामे अहवाल पिक विमा कंपनीने मान्य करुन खरीप , पिक विमा२०२५ तात्काळ देण्यासंदर्भात निर्देश दयावेत ‘ आदिमागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब
ठाकरे पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख रवि डोके यांनी तहसिलदार अक्कलकोट याना दिलेल्या निवेदनात दिला आहे . याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख मनोज पवार ‘सोपान निकते ‘ , जिल्हा समन्वयक अय्याज जमादार ,तालुका संघटक वसंत देडे ‘ आदि शिवसैनिक उपस्थित होते .
Post Views: 25